विभागीय शिक्षण बोर्डाच्या सदस्यपदी नियुक्ती; सोमनाथ बडे यांचा सत्कार
बीड दि.26 (प्रतिनिधी):
मकरध्वज शिक्षण संस्थेचे सचिव तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते प्राचार्य सोमनाथराव बडे यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सदस्यपदी नुकतीच निवड झाली. त्या निमित्ताने बीड येथे त्यांच्या मित्र परिवारांनी सत्कार करून स्वागत केले.
यावेळी शाल श्रीफळ गुच्छ देऊन प्राचार्य सोमनाथ बडे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. सुधाकर आंधळे, हनुमंत वनवे मामा, ऍड. रामभाऊ काशिद, रघुनाथ माने पाटील, रमेश पाटील, पत्रकार नारायण नागरे, तुकाराम राठोड, ज्ञानेश वनवे, आदी उपस्थित होते.