चकलांबा पोलीस ठाण्याचा सपोनि संदीप पाटील यांनी पदभार स्वीकारला
बीड दि.6 (प्रतिनिधी):
जिल्हा पोलीस अधीक्षक बारगळ यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आष्टी आणि चकलांबा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी निर्गमित केले. चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांची बदली उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई यांचे वाचक म्हणून करण्यात आली आहे. चकलांबा पोलिस ठाण्याला जिल्हा विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्ती केली आहे. संदीप पाटील यांनी शनिवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
नुकतेच बीड जिल्ह्यात बदलून आलेले पोलीस निरीक्षक शरद भुतपल्ले यांना आष्टी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी नियुक्ती देण्यात आली आहे तर उपविभागीय पोलिस अधिकारी यांची वाचक सोमनाथ जाधव यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
दरम्यान चकलांबा पोलिस ठाण्याच्या पदभार स्वीकारल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने पाटील यांचा सत्कार करण्यात आला.