बीड, दि. 6: बीड जिल्हा परिषदेच्या आवारात रविवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत तरुणाला अर्जुन कवठेकर (रा. अंकुशनगर, ता. बीड) असे नाव असून तो बीड येथील महाराजा ट्रॅव्हल्स कंपनीत चालक म्हणून काम करत होता.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या: मृत्यूच्या कारणाबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नाही. मात्र, मृतकाच्या नातेवाईकांनी मराठा आरक्षणासाठी त्याने आत्महत्या माहिती दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांचा तपास: बीड शहर पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.