चकलांबा शिवारात वीज पडून तीन महिला ठार; एक जखमी

शेतात काम करत असतांना घडलेला दुर्घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील चकलांबा शिवारात वीज कोसळून तीन महिला ठार झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली. चकलांबा शिवारात काही महिला खुरपणीचे काम करत होत्या. यावेळी अचानक पावसाला सुरुवात झाली. या महिला सुरक्षित स्थळी जाण्यापूर्वीच वीज कोसळल्याने यात तीन महिला ठार झाल्या.

मृत महिलांची नावे

त्यांची नावे विजया राधाकिसन खेडकर (45), शालन शेषेराव नजन (55), लंका हरिभाऊ नजन (42) अशी आहेत. तर यमुनाबाई माणिक खेडकर या जखमी झाल्या आहेत. जखमींवर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सुरक्षित स्थळी जाण्यापूर्वीच वीज कोसळली

याबाबत अधिक माहिती अशी की, चकलांबा शिवारात काही महिला खुरपणीचे काम करत होत्या.यावेळी अचानक पावसाला सुरुवात झाली.या महिला सुरक्षित स्थळी जाण्यापूर्वीच वीज कोसळल्याने यात तीन महिला ठार झाल्या.तर एक महिला जखमी झाली.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

error: Content is protected !!