मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख संजय राऊत यांचा शरद पवारांना फोन

एका वृत्तवाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख देखील केला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना फोन करून त्यांच्याजवळ वृत्तवाहिन्यांच्या भूमिकेसंदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलीये.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या रोखठोक सदरात शरद पवार यांच्या फोनवरच्या संवादाचा तपशील दिला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांच्या एकेरी उल्लेखावरून शरद पवार नाराज झाल्याचंही राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी म्हटलंय, “मुख्यमंत्र्यांचा सरळ एकेरी भाषेत उल्लेख करतात, बदनामीकारक भाषा वापरतात, धमक्या देतात. सोनिया गांधींच्या बाबतीत त्यांनी हेच केले व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून आव्हानाची भाषा करतानाही त्यांना लोकांनी पाहिले. हे सर्व पाहिल्यावर श्री. शरद पवार यांनी मला फोन केला”

”एका वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत होतोय. हे बरोबर नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ही फक्त एक व्यक्ती नसते, तर संस्था असते. ‘Institute’ असा उल्लेख त्यांनी केला. शेवटी त्यांनी प्रश्न केला, मग सरकार काय करते? पवार यांचे मत एका अनुभवी नेत्याचे मत आहे. पत्रकारितेचे हे चित्र चांगले नाही. एक वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत गरळ ओकते व ते सहन केले जाते. त्या वृत्तवाहिनीस महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बळ देतात. सुशांतसिंह हे निमित्त व त्या निमित्ताने सरकार बदनाम करायचे हे मुख्य कारस्थान. ते सुरूच आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!