बीड: मित्रासह विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा श्वास रोखल्याने मृत्यू झाला आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या पुंगणी परिसरात ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे.
साई सयाजीराव सौंदर वय 15 असं मयत मुलाचे नाव आहे. पुंगणी येथील साई सौंदर हा त्याच्या मित्रांसह त्याच्याच शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. पण त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.
दरम्यान या प्रकरणी बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये (Majalgaon Rural Police Station of Beed ) मृत्यूची आकस्मात नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.(Latest News Update)