Beed news मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिवानंद टाकसाळे

राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिवानंद टाकसाळे यांची एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या दोन्ही योजनांच्या सनियंत्रण व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता मुख्य कार्यकारीपदी सेवानिवृत्त भा.प्र.से. शिवानंद टाकसाळे यांची कंत्राटी पदावर एक वर्षासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवानंद टाकसाळे यांनी जून २०११ ते सप्टेंबर २०१४ या कालावधीमध्ये बीड Campaign जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील ११७ तलावांतील लोकसहभागातून गाळ काढला होता. खऱ्या अर्थाने तेव्हापासून तलावातील गाळ काढण्यास राज्यभर सुरुवात झाली होती. तसेच याच कालावधीत टाकसाळे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

error: Content is protected !!