2000 note banned : अशी झाली होती पहिली नोटबंदी; असा आहे इतिहास

First note banned in india 2000 note is not first note which got banned in india

भारतीयांना 8 नोव्हेंबर 2016 ही तारीख चांगलीच आठवत असेल. पण, आता 19 मे 2023 ही तारीखही लक्षात राहील. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चलनातून सर्वात मोठी 2000 ची नोट काढून घेण्याची घोषणा केली आहे. असं असलं तरी ती लीगल टेंडरमध्ये कायम असणार आहे म्हणजेच व्यवहारातून बाद होणार नाहीये.

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जाऊन 2000 च्या नोटा बदलता येतील. एकावेळी नोटा बदलण्याची मर्यादा 20,000 रुपये आहे.

रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी करून बँकांना ग्राहकांना 2000 च्या नोटा न देण्याचा सल्ला दिला आहे. तुमच्याकडेही 2000 च्या नोटा असतील तर तुम्ही त्या तुमच्या खात्यात जमा करू शकता किंवा बँकेच्या शाखेत जाऊन बदलू शकता.

स्वातंत्र्यापूर्वी पहिली नोटाबंदी

1946 मध्ये पहिल्यांदा मोठ्या नोटा बंद झाल्या. 12 जानेवारी 1946 रोजी ब्रिटिश भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल सर आर्चिबाल्ड यांनी मोठ्या नोटांचे चलन रद्द करण्याचा अध्यादेश काढला होता.

13 दिवसांनंतर 26 जानेवारी 1946 रोजी 500, 1000 आणि 10000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या. स्वातंत्र्यापूर्वी 100 रुपयांच्या वरच्या सर्व नोटांवर बंदी घालण्यात आली होती.

काळा पैसा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. असे म्हटलं जात होते की भारतीय उद्योगपतींनी प्रचंड संपत्ती जमा केली होती आणि ती आयकरापासून लपवून ठेवली होती.

1978 ची नोटाबंदी…

त्यावेळी केंद्रात जनता पक्षाचे सरकार होते आणि मोरारजी देसाई पंतप्रधान होते. जनता पक्षाचे सरकार स्थापन होऊन अवघे वर्ष झाले होते.

वृत्तानुसार, 14 जानेवारी 1978 रोजी आरबीआयला सांगण्यात आले की सरकारचा मोठ्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आरबीआयने नोट मागे घेण्यासाठी अध्यादेश काढला आणि तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनीही त्याला मान्यता दिली होती.

यासह 16 जानेवारी 1978 रोजी 1000, 5000 आणि 10000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. 16 जानेवारीला सकाळी ऑल इंडिया रेडिओवर याची घोषणा करण्यात आली होती.

मागील सरकारमधील काही कथित भ्रष्ट लोकांना लक्ष्य करण्यासाठी जनता पक्षाच्या सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जात होते.

demonetization in india 2016, impact of note ban in india, demonetization in india 2020, effects of note ban in india, demonetization of 500 and 1000 rupees notes, effect of demonetisation on indian economy, economic impact of note ban in india, currency notes banned list, currency notes demonet

error: Content is protected !!