Pune Kishor Aware Murder : किशोर आवारे हत्याप्रकरणात आमदार सुनील शेळकेंचा हात;

Pune Kishor Aware Murder : पुण्याच्या तळेगावमध्ये किशोर आवारे हत्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलेलं आहे. या हत्येचा कट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी कट रचल्याचा आरोप आवारे यांच्या आईने केला. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. एफआयआरमध्ये आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकरसह अन्य तीन अनोळखी माणसांचादेखील उल्लेख आहे.

श्याम निगडकरने साथीदारांच्या मदतीने आवारे यांची नगरपरिषदेसमोरच गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या केली. (Mla sunil shelke) आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके आणि संदीप गराडे यांनी कटकारस्थान रचून त्यांचाच साथीदार श्यामला ही हत्या करायला लावली, असं किशोर आवारे यांच्या आईने एफआयआरमध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

किशोर आवारे यांचे  सुनील शेळके, सुधाकर शेळके,संदीप गराडे आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये नेहमीच भांडणे होत होती. गेल्या सहा महिन्यापासून किशोर हे नेहमी मला आमदार सुनील शेळके त्याचा भाऊ सुधाकर शेळके यांच्याकडून जिवाला धोका असल्याबाबत सांगत असत. तसेच माझ्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर ते याच लोकांपासून होईल हे प्रत्यक्षपणे सांगितले होते, असंही नमूद केलं आहे.  किशोर यांनी स्वतःचा वेगळा गट तयार करून सुनील शेळके यांना गेल्या दोन वर्षापासून पूर्णपणे राजकीय विरोध केलेला आहे. तसेच सोशल मीडियावरही ही याबाबत पोस्ट केली होती.

(Kishore aware murder)किशोर आवारे यांनी मार्च महिन्यात सोमटणे टोल नाका बंद करण्यासाठी आमरण उपोषण केलं होतं. त्या दरम्यानच मावळवासीयांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करत, टोल नाक्यावर मोर्चा धाडला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री स्वतः या आंदोलनस्थळी आले होते. त्यानंतर हा टोल नाका बंद करण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात झाली होती. मात्र दरम्यान किशोर आवारे यांचा निर्घृण खून करण्यात आला. आवारे आज नगरपरिषद कार्यालयात गेले होते. त्यावेळी हल्लेखोर कार्यालयाबाहेर दबा धरून बसले होते. ते बाहेर येताच हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार करत कोयत्याने वार केले. आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्यांच्या हत्येमुळे सगळीकडे शोक व्यक्त केला जास आहे. मात्र त्यांच्या आईने दिलेल्या तक्रारीमधेय सुनील शेळकेंचा उल्लेख असल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आलं आहे.

error: Content is protected !!