बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक; एकाच दिवसात 20 हजार कट्टे, प्रथमच मोजण्यासाठी लागले दोन दिवस

हिंगोली: राज्यात सांगलीनंतर (sangli) सर्वात जास्त हळदीची विक्री (Sale of turmeric) ही हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील संत नामदेव मार्केट यार्डमध्ये (Sant Namdev Market Yard) होत असते. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात हळदीची विक्री हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असल्याचं चित्र दिसत आहे. सोमवारी एकाच दिवशी 20 हजारच्या जवळपास कट्टे (गोणे) आल्याने या सर्व हळदीचे बिट होऊ शकले नाही. त्यामुळे 60 च्या जवळपास वाहनांचे बिट दुस-या दिवशी म्हणजे आज होणार आहे. मोजणीसाठी दोन दिवस लागल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत (nanded krushi utpan bajar samiti) मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, संभाजीनगर, यवतमाळ, धाराशिव या भागातूनही हळद उत्पादक आपला माल विक्रीसाठी नांदेड येथील बाजारपेठेत आणतात.  बाजार समितीत नेहमी दहा ते बारा हजारे हळदीचे कट्टे दाखल होतात. त्यांची एकाच दिवशी मोजणीही करण्यात येते. दरम्यान अवकाळी पावसाने उघडीप दिल्याने सोमवारी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एकाच दिवशी 20 हजारच्या जवळपास हळदीचे कट्टे दाखल झाले आहेत. त्यापैकी 60 वाहनांचे बिट सोमवारी होऊ शकले नाही. सकाळी दहा वाजता सुरु झालेले बीट सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालले, अशी माहिती नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव साहेबराव बाऱ्हाटे आणि एम. पी. पाटील यांनी दिली. 

दरम्यान, नांदेड बाजार समितीतील वाढणारी हळदीची आवक लक्षात घेवून बाजार समिती प्रशासनाने हळद घेवून येणाऱ्या उत्पादकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याचे चोख नियोजन केले असून सोमवारी ज्यांचे बिट झाली नाही त्यांचे नियोजन मंगळवारी केले आहे. या संदर्भात सर्वांना बाजार समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

8 हजार 100  रूपये प्रति क्विंटला दर 

नांदेड बाजार समितीत हळदीची आवक वाढली असली तरी हळदीचा दर सोमवारी प्रति क्विंटल 8 हजार 100 रुपये तर, सरासरी 6  हजार 700 ते 6 हजार 800 रूपये आहे. सध्या चांगल्या प्रतिचा माल येत असून ओलावा असलेला मालाचे प्रमाणही ब-यापैकी आहे, असे  बीट प्रमुख बी. एस. शेळके यांनी सांगितले. (Rate of turmaric)

error: Content is protected !!