पुढील तीन दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे | हवामान विभागाने (Weather Department) पुणे आणि परिसरासाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे. दिवसा ऊन तर दुपारनंतर काहीसे ढगाळ वातावरण अशी अनुभूती पुणेकरांना झाली.

हवामानाची स्थिती पाहता उत्तर कर्नाटक व परिसरावर सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात तुरळक भागात पावसाची शक्यता कायम आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि पावसाची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरात आग्नेय भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

error: Content is protected !!