पुण्यामधील हिंजवडी येथे सायबर क्राइमचा धक्कादायक प्रकार घडला आहे. लिंक रजिस्ट्रेशन करून त्यावरून व्हिडिओ लाइक केल्यानंतर ५० रुपये मिळतील असे आमिष दाखवून तब्बल १२ लाख २३ हजार रुपयांना तरुणाला लुटले आहे. (CYBER CRIME ALERT!! In Pune, a young man who liked a video On his mobile link was robbed for Rs 12 lakh)
एक पुण्यामधील तरुणाला सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकून तब्बल १२ लाख २३ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. १४ आणि १५ जानेवारी २०२३ रोजी हिंजवडी येथे हा सर्व प्रकार घडला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यामध्ये रवी सोनकुशरे (वय ४३, रा. ब्लूरिज सोसायटी, हिंजवडी) यांनी तक्रार नोंदवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवीला पैसे मिळतील असे आमिष दाखवण्यात आले होते. त्यासाठी त्याला एका लिंकवर क्लिक करून त्यात रजिस्टर करायचे होते. पुढे त्याला एक व्हिडिओ लाइक केल्यनानंतर ५० रुपये मिळणार होते. ५० रुपयांसाठी रवीने ही सगळी प्रक्रिया केली.
त्यानंतर रवीला पैसे गुंतवल्यावरच अधिक रक्कम मिळेल असा विश्वास देण्यात आला होता. त्यामुळे रवीने पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला त्याला १६ वेळा रिफंड देखील मिळाला होता. त्यामुळे त्यानी 12 लाख 23 हजार रुपये ऑनलाइन गुंतवले होते. मात्र रिफंड आणि बोनसबाबत विचारणा केली असता आरोपींनी रवीला कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे रवीने तातडीने पोलिसांना हा सर्व प्रकार सांगत तक्रार केली.
दरम्यान, पुन्हा एकदा या प्रकरणानंतर सायबर गुन्ह्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखविल्या जाणाऱ्या आमिषांना बळी पडू नका असे आव्हान केलं आहे. तसेच पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
अश्या एका चोरीची घटना चिंचवड, काकडे पार्क येथे घडला आहे. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरातील 42 हजार 350 रुपय चोरून नेले आहेत. ३१ डिसेंबर ते १६ जानेवारी या कालावधीमध्ये ही घटना घडली आहे. ५१ वर्षीय महिलेने या घटनेची तक्रार चिंचवड पोलिस ठाण्यामध्ये केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 31 डिसेंबर रोजी तिच्या गावी गेल्यानंतर चोरट्यांनी २७ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरून नेली होती. त्यासोबत १५ हजार रुपयांची रोक रक्कम असे एकूण ४२ हजार ३५० रुपयांची चोरी करण्यात आली होती. हा सर्व प्रकार महिला १६ जानेवारी रोजी गावाहून परत आल्यानंतर उघडकीस आला होता.