जालना; पहाटेच्या वेळी पेट्रोलपंप शेजारी उभा होता अज्ञात ट्रक, आतील दृश्य पाहून लोकांची उडाली तारांबळ…

जालना: औरंगाबाद चौफुली परिसरातील सिंधू पेट्रोल पंपावर मृतदेह सापडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी झाली असून एका ३२ वर्षीय व्यक्तीने उभ्या असलेल्या आयशर कारमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (In Jalna on the Petrol Pump the Dead Body Of the Youth Was Found In the Parked Eicher Car)

पेट्रोलपंपावर घडलेल्या या धक्कादायक घटनेने सर्वांचीच घाबरगुंडी उडाली आहे. एका तरुणाने त्याचा गाडीतच फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर तरुणाने आयशर गाडीच्या छताला दोरी बांधून त्यात गळा फसवून आत्महत्या केल्याचे दिसत होत. truck on petrol pump

मृत तरुणाचे नाव शेख कलीम उस्मान शेख असे होते. तो तरुण जालना शहरातील संजयनगर भागामध्ये राहत होता. तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह गाडीत लटकत होता. हा सर्व प्रकार गाडीच्या मागील बाजूचे तप्पड उघडून पाहिल्यानंतर उघडकीस आला होता.

ही गोष्ट परिसरात झपाट्याने पसरल्यानंतर लोकांची गर्दी झाली होती. त्यानंतर पोलिसांना देखील या घटनेबद्दल सांगण्यात आलं होत. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच  घटनास्थळी धाव घेतली होती.

पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करून मृतदेह गाडीतून खाली उतरवला. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालया मध्ये या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

शेख कलीम शेख उस्मान याने हा टोकाचा निर्णय का घेतला याबद्दल कोणतीच माहिती अद्याप मिळाली नाही. मात्र घटनास्थळी असलेले दृश्य पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. तसेच शेख कलीम शेख उस्मान याच्या मृत्यूनंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Crime on petrol pump.

error: Content is protected !!