अर्थसंकल्पाच्या आधी मुकेश अंबानींना लॉटरी; एका दिवसात इतके अब्ज डॉलरची कमाई

नवी दिल्ली: थोड्याच वेळात संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. निर्मला सीतारामन यांच्या या अर्थसंकल्पावर संपूर्ण देशाची नजर असणार आहे. सर्व सामान्यांप्रमाणेच देशातील उद्योजक देखील या अर्थसंकल्पाकडे मोठ्या आशेने पाहत असतील अशात आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना अर्थसंकल्पाच्या आधी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

अर्थसंकल्पाच्या एक दिवश आधी मुकेश अंबानी यांची संपत्ती २.५१ अब्ज डॉलर म्हणजेच १८ हजार ७१७ कोटी रुपयांनी वाढली. देशातील सर्वात मोठी कंपी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर सोमवारी २.१८ टक्क्यांनी वाढले. यामुळे अंबानींच्या संपत्तीत वाढ झाली. Bloomberg Billionaires Index नुसार अंबानी ९०.६ अब्ज डॉलर इतक्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत ११व्या स्थानावर पोहोचले आहेत.

वार्षिक कमाईच्या बाबतीत सध्या गौतम अदानी अव्वल स्थानी आहेत. Bloomberg Billionaires Index नुसार या वर्षी अदानीच्या संपत्तीत ९.१६ अब्ज डॉलर इतकी वाढ झाली आहे. तर अंबानींची संपत्ती ६३ कोटी डॉलरने वाढली आहे. जगातील १० अति श्रीमंत लोकांमधील वॉरेन बफे यांची संपत्ती ४.४७ अब्ज डॉलरने वाढली आहे. तर अन्य सर्वांच्या नेटवर्थमध्ये घसरण झालीय. या यादीत अव्वल स्थानी असलेले अॅलन मस्क याच्या संपत्तीत सर्वाधिक म्हणजे २८.६ अब्ज डॉलर इतकी घट झाली आहे.

हे सुद्धा वाचा:-

जगातील सर्वाधिक मुल्य असलेली ऑटो कंपनी टेस्लाचे सीईओ मस्क यांची संपत्तीत सोमवारी २१.४ अब्ज डॉलर इतकी वाढ झाली. ते आता २४२ अब्ज डॉलरसह अव्वल स्थानी आहेत. अमेझॉनचे जेफ बेजोस यांची संपत्ती १७५ अब्ज डॉलर इतकी असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. फ्रान्समधील उद्योपती बर्नार्ड आरनॉल्ट हे तिसऱ्या तर बिल गेट्स १३० अब्ज डॉलरसह चौथ्या स्थानावर आहेत.सोमवारी अंबानी यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीमुळे त्यांनी गौतम अदानी आणि स्वत:मधील अंतर वाढवले आहे. Bloomberg Billionaires Index नुसार सोमवारी अदानी यांच्या संपत्तीत ५.६८ कोटी डॉलर वाढ झाली. ते ८५.७ अब्ज डॉलरसह अंबानी यांच्यानंतर १२व्या स्थानावर आहे. अंबानी आशिया खंडात अव्वल तर अदानी दुसऱ्या स्थानावर आहेत. दोघांच्या संपत्तीत ४.९ अब्ज डॉलरचे अंतर आहे.

error: Content is protected !!