संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना मोठा झटका

मुंबई | भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे चांगलेच अडकले असून हा तिढा वाढतच चालल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता सर्वोच्च न्यायालयानं आज नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.येत्या 10 दिवसांत नितेश राणे यांना जिल्हा सत्र न्यायलयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत निेतेश राणे यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

नितेश राणे हे 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर होऊन नियमित जामीन अर्ज दाखल करु शकणार आहेत. मात्र, अटकपूर्व जामीनाचा मार्ग नितेश राणे यांच्यासाठी बंद झाला आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे का होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे सध्या अडचणींत आहे. याप्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात आल्यापासून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ पहायला मिळत आहे.

error: Content is protected !!