आत्मनिर्भर भारत! 101 संरक्षण उत्पादनांवर आयात बंदी; राजनाथ सिंहांची मोठी घोषणा

नवी दिल्ली – 101 संरक्षण उत्पादनांची आयात बंद करणार असून भारत आत्मनिर्भर होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. संरक्षण खात्याने हे सर्वात मोठं पाऊल उचललं आहे. राजनाथ सिंह यांनी आज मोठा निर्णय घेत संरक्षण खातं हे आत्मनिर्भर भारत अभियानासाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून 101 संरक्षण उत्पादनांची एक यादी तयार करण्यात आली आहे. या 101 उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्यात येणार आहे. या यादीत सामान्य पार्टसशिवाय काही ‘हाय टेक्नॉलॉजी वेपन सिस्टम’चाही समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाकडून निश्चित करण्यात आलेल्या ‘निगेटिव्ह आर्म्स लिस्ट’नुसार या संरक्षण साहित्याच्या आयातीवर बंदी घालण्यात येणार आहे.

देशातील उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ बनवण्याच्या आवाहनानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचंही देखील त्यांनी सांगितलं आहे. यामुळे भारताच्या संरक्षण व्यावसायाला मोठ्या प्रमाणात उत्पादनाची संधी मिळेल असं संरक्षणमंत्र्यांनी म्हटलं आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक यादी तयार करण्यात आली आहे. भारतीय लष्कर, जनता आणि खासगी व्यावसायांशी चर्चा करून यादी तयार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अशा उत्पादनांच्या 260 योजनांसाठी तिन्ही सेनांनी एप्रिल 2015 पासून ऑगस्ट 2020 पर्यंत जवळपास साडे तीन लाख कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्टस दिल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे. तसेच येत्या 6 ते 7 वर्षांत स्थानिक इंडस्ट्रीला जवळपास चार लाख कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्टस दिले जातील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त करण्यात आला आहे.

संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व स्टेकहोल्डर्सशी चर्चा केल्यानंतर उत्पादनांच्या आणि उपकरणांच्या आयातीवर बंदी घालण्यात येणार आहे. सध्या जे निर्णय घेण्यात आलेत ते सर्व 2020 ते 2024 दरम्यान लागू केले जातील. 101 उत्पादनांच्या यादीत ‘आर्म्ड फायटिंग व्हेईकल्स’चाही (AFVs) समावेश आहे. आर्थिक वर्षात जवळपास 52 हजार कोटी रुपयांचं वेगळं बजेट तयार केलं जाणार आहे. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!