कडा : फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवडय़ात आष्टी ते मुंबई नियमित रेल्वे धावणार आहे. या रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे याच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन होणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून समजली आहे. बीड जिल्ह्यात नगर-परळी रेल्वेचे काम वेगात सुरू आहे. दरम्यान आष्टी ते नगर 60 किमीचे काम पूर्ण झाले आहे. याची चाचणी देखील यशस्वी झाली आहे. आता 4 फेब्रुवारीच्या दरम्यान हे उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे. गोपीनाथ मुंडेंनी दिलं योगदान अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग 261 किलोमीटरचा असून गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न रखडला होता. रेल्वेमुळे औद्योगिक वसाहती निर्माण होण्यात मोठ्या अडचणी होत्या. शिवाय बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठी अडचणी होत होती. 1995 साली या नगर बीड परळी रेल्वे मार्गला तत्वतः मंजुरी मिळाली होती. मात्र, त्यानंतर अनेक वर्ष राजकीय इच्छाशक्ती अभावी या मार्गाचे काम रखडले. दरम्यान, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी रेल्वे मार्गासाठी भरभरून योगदान देत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या मार्गासाठी भरीव निधीची तरतूद केली.