देशात 27 डिसेंबरपासून सुरु झालेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दररोज संक्रमितांची संख्या सलग वाढत आहे. तिसऱ्या लाटेत आतापर्यंत जवळपास 31 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामधून 6,912 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर केवळ 0.2% आहे, म्हणजे 1000 रुग्णांमधून केवळ 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा दर जगात सर्वात कमी आहे.
वेगवेगळ्या देशांमध्ये केलेल्या संशोधनानुसार, ओमायक्रॉनन व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेत 8 पट कमी प्राणघातक आहे. त्यामुळे रुग्णांची नोंद असूनही अनेक देश निर्बंध लादत नाहीत. स्पेनने कोरोना हा सामान्य फ्लू घोषित केला आहे.
पहिल्या लाटेत इतक्या केसमध्ये 58 हजार मृत्यू झाले
आरोग्य तज्ञ याला मोठा दिलासा मानत आहेत, कारण कोरोनाच्या पहिल्या लाटेत सापडलेल्या सुरुवातीच्या 31 लाख रुग्णांपैकी 57,921 रुग्णांचा मृत्यू झाला होता. पहिल्या लाटेत एकूण 1.22 कोटी संक्रमित लोकांची पुष्टी झाली. यानंतर दुसऱ्या लाटेत 2.34 कोटी रुग्ण आढळले.
दुसऱ्या लाटेत सापडलेल्या सुरुवातीच्या 31 लाख रुग्णांपैकी 21,244 रुग्णांचा मृत्यू झाला होता. हे आकडे राज्य सरकारांचेही होते, ज्यात आतापर्यंत सुधारणा केल्या जात आहेत. याचा अर्थ मृतांची संख्या 21,244 पेक्षा जास्त होती.
11 मार्चपर्यंत देशात नवीन रुग्ण येणे थांबेल
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) अतिरिक्त संचालक डॉ. समीरन पांडा यांनी सांगितले की, जर कोणताही नवीन प्रकार आला नाही, तर 11 मार्चपर्यंत कोरोना एंडेमिक टप्प्यात जाईल. त्यांनी सांगितले की, मॅथमॅटिकल मॉडेलनुसार, ओमायक्रॉन फक्त 3 महिने टिकेल आणि 11 मार्चनंतर देशात नवीन कोरोना रुग्ण जवळजवळ बंद होतील.
ओमिक्रॉन व्हेरिएंटनेच संपेल महामारी
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस अजेंडा कार्यक्रमादरम्यान, अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एंथोनी फॉसी यांनी सांगितले की, ओमिक्रॉन केवळ महामारीला एंडेमिक फेजमध्ये घेऊन जाईल. यूएस राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. फौसी म्हणाले, ‘हे सांगणे थोडे घाईचे होईल, परंतु मला विश्वास आहे की ओमायक्रॉन महामारीचा अंत करेल.’