नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने ४ जबरदस्त प्रीपेड प्लान लाँच केले आहे. चार पैकी ३ रिचार्ज प्लान्सची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी आहे. तर एका प्लानची कंमत ३४७ रुपये आहे.
२०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतात. तर ३४७ रुपयांचा प्लान ५६ दिवसांच्या वैधतेसह येतो. २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत कंपनीने १८४ रुपये, १८५ रुपये आणि १८६ रुपयांचा प्लान आणला आहे.
BSNL चे २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्लान
BSNL च्या १८४ रुपये, १८५ रुपये आणि १८६ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. तिन्ही प्लान्समध्ये दररोज १ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. डेटा लिमिट समाप्त झाल्यावर इंटरनेट स्पीड ८० Kbps होईल.
तिन्ही प्लान्समधील फरक सांगायचा तर १८४ रुपयांच्या प्लानमध्ये Lystn पॉडकॉस्टचा फायदा मिळतो. १८५ रुपयांच्या प्लानमध्ये चॅलेंजेस एरिना मोबाइल गेमिंग सर्व्हिस आणि BSNL ट्यून्सचा फायदा मिळतो. तर १८६ रुपयांच्या प्लानमध्ये Hardy Games आणि BSNL ट्यून्सचा फायदा मिळेल.
BSNL चा ३४७ रुपयांचा प्लान
BSNL च्या ३४७ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता मिळते. प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा यानुसार एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये १०० एसएमएसची सुविधा दिली जात आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, चॅलेंजेस एरिना मोबाइल गेमिंग सर्व्हिसचा फायदा मिळतो.