भीषण अपघात: बीडमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, सहा जण जागीच ठार; आठ जण गंभीर जखमी

बीडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी सकाळी लातूर-अंबाजोगाई रोडवर बस आणि ट्रकची भीषण धडक झाली. या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आठ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की, बस आणि ट्रकचा चुराडा झाला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

बीडमधील लातूर-अंबाजोगाई मार्गावर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. लातूरहून औरंगाबादला निघालेल्या एसटीचा बसचा अपघात झाला. अंबाजोगाईमध्ये वळणावर एसटी आणि ट्रकची जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण आहे की, बचावकार्यासाठी घटनास्थळी क्रेन बोलावण्यात आली. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आज जण हे गंभीर जखमी आहेत.

या अपघाताची माहिती मिळताचा स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे देखील पाहायला मिळाले. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

error: Content is protected !!