अंबाजोगाई येथील रहिवासी डॉ. आदित्य पतकराव यांचा लोकमत हेल्थ आयकॉन पुरस्काराने गौरव

अंबाजोगाई :  अंबाजोगाई येथील रहिवासी तथा पुणे येथील प्रख्यात दंत चिकित्सक डॉ. आदित्य पतकराव यांचा दैनिक लोकमत वृत्तपत्र समुहाने “पुणे हेल्थ आयकॉन” हा पुरस्कार देवून गौरव केला. (A resident of Ambajogai, Dr. Aditya Patkrao honored with Lokmat Health Icon Award)

पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात डॉ. आदित्य पतकराव यांचा राज्याचे गृहराज्यमंत्री मा. सतेज पाटील, छत्रपती मालोजी राजे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते माझा पुणे हेल्थ आयकॉन या सन्मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. आदित्य पतकराव यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे केज विधान सभा मतदार संघाच्या आ. नमिता अक्षय मुंदडा,  विधान परीषदेचे सदस्य आ‌. संजय दौंड, नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, जि.प. सदस्य तथा माजी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार व त्यांच्या सर्व मित्र परिवाराने हार्दिक शुभेछ्या दिल्या आहेत.

    डॉ. आदित्य पतकराव हे अंबाजोगाई येथील रहिवासी असून अतिशय प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी दंत वैद्यकीय क्षेत्रात अनेक शोध निबंध सादर करीत नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करीत वैद्यकीय क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. यापुर्वीही डॉ. आदित्य पतकराव यांनी लिहिलेल्या विविध शोधनिबंधांची व दंत वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेवून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.

error: Content is protected !!