होय, मी भक्त आहे आणि मला अभिमान आहे – अमृता फडणवीस

मुंबई | गेल्या आठवड्याभरात लसीकरणाचा वेग वाढला असून आकडेवारीनुसार भारतानं डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे.

होय, मी भक्त आहे आणि त्याचा मला अभिमान आहे, असे अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या ट्विटसोबत भारतात आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची आकडेवारी देण्यात आली आहे.

21 जूनपासून देशात 18 ते 44 या वयोगटासाठी देखील केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी 83 लाख नागरिकांना लस देण्यात आली. आता भारतानं विक्रमी लसीकरण केलं आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक 32,36,63,297 लसीचे डोस देण्यात आले असून दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत आजपर्यंत सर्व प्रकारच्या लसींचे मिळून 32 कोटी 33 लाख 27 हजार 328 डोस देण्यात आले आहेत.

error: Content is protected !!