पुढचे तीन ते चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

मुंबई | येत्या तीन ते चार दिवसात कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करून मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.(

Senior meteorologist KS Hosalikar tweeted warning of heavy rains.)

मुंबईत ठाणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. ढगाळ वातावरण अजूनही असून हवामान विभागानं येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागानं जाहीर केलेल्या अलर्टनुसार, मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी उद्यापासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

error: Content is protected !!