मुंबई | गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण आला आणि परिणामी अनेकांना उपचाराअभावी आपला प्राण गमवावा लागला. परंतु, आता महाराष्ट्रातील रुग्ण संख्या ही हळूहळू आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र समोर येत असताना कालची आकडेवारी काही प्रमाणात चिंता वाढवणारी आहे.
काल महाराष्ट्रात 09 हजार 350 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 1 5हजार 176 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. 24 तासात महाराष्ट्रात 388 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 59 लाख 24 हजार 773 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 56 लाख 69 हजार 179 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 1 लाख 14 हजार 154 जणांनी आपला प्राण गमावला आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 38 हजार 361 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, गेल्या काही महिन्यात वाढणारी रुग्णसंख्या ही कमी झाल्याने महाराष्ट्रात दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली आहे. अशीच रुग्णसंख्या कमी होत राहिल्यास तर महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल.