मुंबई | Mumbai ठाकरे सरकारमधील काँग्रेस पक्षाचे राज्य प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole )यांनी आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दाराआड चर्चा यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली शरद पवारांची भेट यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. अशातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्रिपदावरून ठाकरे सरकारमधील पक्षांना टोला हाणला आहे.
येत्या काळात भाजप- शिवसेना एकत्र निवडणुक लढवणार का?, यावर 2024ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असल्याचं रावसाहेब दानवे म्हणाले. त्यासोबतच राजकीय मतभेद आहेत मनभेद नाही म्हणून मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच स्वागत केलं. त्यावेळी दोघांमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं रावसाहेब दानवेंनी सांगितलं.
नाना पटोलेंच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर बोलताना, आमची इच्छा आहे की, महाविकास आघाडीचे तीन पक्षांचे तीन मुख्यमंत्री येत्या काळात झाले पाहीजेत. कारण 2024 नंतर भाजपची सत्ता असणार आहे, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजप नेते नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचं बोललं जात आहे. (BJP leader Narayan Rane will get a place in the Union Cabinet) याबाबतही दानवेंनी भाष्य केलं. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगल काम केल आहे. मात्र त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासंदर्भात निर्णय आमचे दिल्लीतील नेते घेतील असं दानवे म्हणाले.