नारायण राणे दिल्लीला रवाना
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra modi) , गृहमंत्री अमित शहा(amit shaha) आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यात झालेल्या बैठकीनंतर लवकरच मंत्री मंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्यातच महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार या चर्चा सुद्धा रंगल्या होत्या. त्यातच आता भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा ठोकणार? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर
तसेच आज नारायण राणे हे दिल्ली दौऱ्यात भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत.(Narayan Rane will meet BJP president JP Nadda during his visit to Delhi) नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना, मराठा चेहऱ्याच्या निमित्ताने नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार मोदी कॅबिनेटमध्ये काही मंत्रिपदांची आदलाबदली, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. त्यातच महाराष्ट्रातील एका भाजप नेत्यांचं केंद्रीय मंत्रिपद धोक्यात असल्याची कुजबूज आहे. त्यामुळे त्यांना हटवून नारायण राणेंसारखा आक्रमक चेहरा दिला जाऊ शकतो. तसेच सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा शिवसेनेला थेट अंगावर घेण्याचा मुद्दा असो, सध्या भाजपकडे नारायण राणे यांच्यासारखा दुसरा नेता नाही. त्यामुळे ठाकरे सरकारला थेट चॅलेंज देऊन, कोकणात भाजप वाढविण्यासाठी नारायण राणे यांची मदत होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा