पुणे | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे (MP Sambhaji Raje Chhatrapati and Chhatrapati Udayan Raje)यांची आज पुण्यात औंधमध्ये बैठक पार पडली. आरक्षणाच्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असल्यामुळे सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. बैठक झाल्यानंतर उदयनराजे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
या मुद्यावरून केवळ राजकारणी व्यक्ती केंद्रित झाले आहेत. उद्रेक झाला तर आम्ही काही करू शकणार नसल्याचा सूचक इशारा उदयनराजे यांनी दिला आहे. त्याचबरोबर लोकशाहीतील राजे नीट वागत नसतील तर त्यांना आडवा आणि गाडा. माझ्या पासून सुरुवात करा. मला प्रश्न विचारा, असंही ते म्हणाले आहेत.
संभाजीराजेंच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच याबाबत भाजपची भूमिका विचारताना तुम्ही पंतप्रधानांना भेटनार का? असा प्रश्न विचारण्याला आला. त्यावर कोण काय बोलतं? प्रत्येकाचे विचार एक सारखे नसतात आणि ते असावे अशी अपेक्षाही करणं चुकीचं असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
तसेच, मराठा आरक्षणामध्ये यात पक्ष आणू नका. हे सगळ्याचं पक्षांना लागू होतं. इथं प्रश्न समाजाचा आहे. आरक्षणाचा प्रश्न ही राज्याची जबाबदारी आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, असंही उदयनराजे म्हणाले आहेत.