2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू- चंद्रकांत पाटील

सांगली | जयंत पाटील यांना आगामी 2024 च्या निवडणुकीत घरी पाठवू, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील इस्लामपूर येथील नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुल याठिकाणी एका कार्यक्रमात बोलत होते.(We will send Jayant Patil home in 2024 elections – Chandrakant Patil)

राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांना छद्मीपणे बोलण्याचा परमेश्वराने एक आशिर्वाद दिलाय. पण कार्यकर्ते बरोबर असतील 2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू. जर आपण आपल्यात एकजुट ठेवली असती तर ते या निवडणुकीत देखील शक्य होतं. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वजण एकजुटीने काम करु, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना खासदार संभाजीराजेंवर देखील निशाणा साधला. संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, मी भाजप खासदार नाही. पण ऑन पेपर ते भाजपचे खासदार आहेत.  मला त्या वादात पडायचं नाही. मराठा आंदोलनात कोणी चालढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.(Speaking on the occasion, Chandrakant Patil also targeted MP Sambhaji Raje. Sambhaji Raje says I am a President appointed MP, I am not a BJP MP)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 16 तारखेला कोल्हापुरातून मोर्चाची हाक दिल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणे भूमिका घेण्याचं आवाहन केलंय.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना खासदार संभाजीराजेंवर देखील निशाणा साधला. संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, मी भाजप खासदार नाही. पण ऑन पेपर ते भाजपचे खासदार आहेत.  मला त्या वादात पडायचं नाही. मराठा आंदोलनात कोणी चालढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 16 तारखेला कोल्हापुरातून मोर्चाची हाक दिल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणे भूमिका घेण्याचं आवाहन केलंय.

error: Content is protected !!