भाजप नगरसेवकाची दहशतवाद्यांकडून हत्या, घरात घुसून गोळीबार

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील भाजपचे नगरसेवक राकेश पंडिता यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते पुलवामा जिल्ह्यातील त्रालचे नगरसेवक होते. सुरक्षेशिवाय घरबाहेर न पडण्याचा इशारा पोलिसांनी त्यांना दिला होता. परंतु बुधवारी (2 जून) संध्याकाळी ते शेजाऱ्यांच्या घरात असतानाच दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं. या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दु:ख व्यक्त करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. 

या हल्ल्यात शेजाऱ्यांची मुलगीही जखमी झाली आहे. मृत भाजप नेते राकेश पंडिता जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा जनाधार वाढवण्याचा काम करत होते. पक्षात तरुणांना सामील करुन घेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेते राकेश पंडिता हे मुलगा ब्रज नाथसोबत काही कामाच्या निमित्ताने शेजारी राहणाऱ्या मुश्ताक अहमद यांच्या घरी गेले होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

error: Content is protected !!