राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती
(27 May)राज्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची मर्यादा १ जूनला संपणार असून १ जूननंतर लॉकडाऊन वाढणार का संपणार असा प्रश्न राज्यातील जनतेसमोर सध्या उभा राहिला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.