बीड जिल्ह्यातील अनेक दुकाने केले सील
(25 May)- बीड जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन असतांना काही व्यापारी लपून छपून दुकान उघडतात. आज सकाळी शाहू नगर भागातील संत शिरोमणी टेक्सटाईल्स या कपडाच्या दुकानदाराने नियमाचं उल्लघन केल्याचे समोर आल्यानंतर सदरील दुकानदारास शिवाजी नगर पोलीसांनी नगर पालिकेच्यावतीने २५ हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.
केज शहरातील बाजार समिती परिसरात पाच दुकाने सुरू असल्याची माहिती नगरपंचायत आणि तहसीलदार यांना झाल्यानंतर त्याठिकाणी जावून संबंधित दुकानदारावर कारवाई करत त्यांच्याकडून १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याचप्रमाणे धारूर शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करणारी पाच दुकाने आज प्रशासनाने दंडात्मक कारवाई करून सील केली.