अंबाजोगाई येथील घटना
(25 May)- अंबाजोगाई येथील काळवटी तलावात पोहत असताना एका पंधरा वर्षीय मुलीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी पोहत असताना वैष्णवी वचिष्ट भोसले ही १५ वर्षीय मुलगी बुडाली. तिला जखमी अवस्थेत बाहेर काढून स्वाराती रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने अंबाजोगाई शहरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.