होम आयसोलेशन बंदच्या निर्णयाला विरोध

पुण्याच्या महापौरांनी केला विरोध

Pune- (26 May) महाराष्ट्र सरकारने कोरोना बाधितांच्या संदर्भातील नियमांत बदल करत होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या होम आयसोलेशनमध्ये रुग्णांना आता इथून पुढे राहता येणार नाही अशी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीला पुण्याच्या महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार विरोध केला आहे. ज्या वेळेस गरज होती तेव्हाच हा नियम लागू करायला हवा होता अस सांगत सद्य परस्थितीत पुण्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आला असताना पुन्हा नव्याने हा नियम आणायचं औचित्य लक्षात येत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. आता इथून पुढे होम आयसोलेशनच्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण आणि त्यांची व्यवस्था करणं शक्य नसल्याचं सांगितलंय आहे.

रुग्णांची संख्या वाढत गेल्यास जागा अपुरी पडणार, राज्य सरकारने नव्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मागणी केली आहे.राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्या ठिकाणी कोविड सेंटर वाढवून रुग्णांना आयसोलेशन करण्याच्या सूचना दिल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. होम आयसोलेशन बंद करण्याच्या निर्णयाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध दर्शवला आहे.

राज्याच्या सरासरी एवढ्या पॉझिटिव्हिटी दरापेक्षा 18 जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. होम आयसोलेशन (गृह अलगीकरण) ऐवजी कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरणावर भर द्यावा. ग्रामीण भागातील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 15 वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी 25 टक्के निधी हा कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

error: Content is protected !!