सराफ हत्याप्रकरणातील आरोपीच्या मामानं घेतला गळफास

सलूनच्या दुकानात घेतला गळफास

(26 May)- बीड जिल्ह्यातील शिरूर येथील सराफा हत्या प्रकरणातील या प्रकरणातील मुख्य आरोपी भैय्या गायकवाड हा फरार असून यातील अन्य दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. भैय्या गायकवाड याचा तपास करण्यासाठी पोलीस वेगवेगळे हतखंडे वापरत आहेत. त्याच्या शोधासाठी भैय्या याचा मामा आदिनाथ धोंडीराम गायके यास चौकशीसाठी बोलवून अपमानास्पद वागणूक देत त्याला मारहाणही केली गेली. यातून आदिनाथ गायके याने रात्री शिरूर येथील सलूनच्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली.

सदरचा प्रकार हा रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणात शिरूर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आज सकाळी मयत आदिनाथ याच्या बहिणीने पोलिसात येऊन तुमच्या त्रासाला कंटाळूनच भावाने आत्महत्या केल्याची तक्रार केली. मात्र अशी तक्रार आमच्याकडे आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर आदिनाथ गायके यास चौकशीसाठी बोलवले नसल्याचा दावाही शिरूर पोलिसांनी केला मात्र गायके यांच्या नातेवाईकांनी थेट शिरूर पोलिसांवर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!