मुलीच्या पित्याने पोलीस अधिक्षक बीड यांच्याकडे केली तक्रार
(22 May)- माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथील वडीलांच्या घरुन बेपत्ता झालेल्या मुलीचा तपास लावण्यासाठी दिंद्रुड पोलीसांनी चाळीस हजार रुपये मागितल्याची तक्रार मुलीच्या पित्याने दि. २० मे रोजी पोलीस अधिक्षक बीड यांच्याकडे केली आहे. या बाबत अधिक माहीती अशी की बेलुरा येथील ४० वर्षीय शेतकन्यांनी पोलीस अधिक्षक यांना तक्रार दिली असून त्यानी तक्रारीत असे म्हटले आहे की २५ एप्रिल रोजी दिंद्रुड पोलीस स्टेशन ला अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फुस लावून पळविल्याची फिर्याद दिली होती.
सदर फिर्यादीवर दिंद्रुड पोलिसांनी एफ आर नं. ७६ / २०२१ कलम ३६३ भाद व नुसार गुन्हा नोंद केला. मात्र घरातुन आचानक मुलगी बेपत्ता झाल्याने सदर शेतकरी बेजार असतांना जीवातील हनुमान अर्जुनराव फपाळ हा त्यांच्याकडे आला व तुझी मुलगी जर हवी असेल तर पोलीस स्टेशनच्या साहेबांना रक्कम रु ४० हजार रुपये खर्च म्हणून द्यावे लागतील असे म्हणला, त्यावर सदर शेतकऱ्यानी १५ हजार रुपयाची तडजोड करून पोलीसांना देण्यासाठी दिले.
नंतर आठ दिवसांनी हनुमान अर्जुनराव फपाळ हा आणखी राहिलेल रु २५ हजार द्या म्हणून सतत मोबाइल वरून मागणी करू लागला व सतत साहेबांना पैसे हवेत म्हणून धमकावत असल्याने सादर शेतकऱ्याने पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे धाव घेतली आणि तक्रार केली आणि मुलीचा तात्काळ तपास लावून द्यावा अशी मागणी केली