पुढिल उपचारासाठी स्वाराती रूग्णालय अंबाजोगाई दाखल
(24 May)- ओरल म्युकरमायकोसीस आजाराचा प्रथम रुग्ण बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे शनिवारी आढळून आला. माजलगावातील स्मित दातांचा दवाखान्यात डॉ सचिन देशमुख यांनी या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाचे निदान केले असता सदरील रुग्णास ओरल फंगल इन्फेक्शन झाल्याचे निष्पन्न झाले.
या रुग्णाची तब्येत व्यवस्थित असून पुढिल उपचारासाठी स्वाराती रूग्णालय अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहे. अशा प्रकारचे इन्फेक्शन होण्याचे प्रमाण कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये वाढत चालल्याचे चित्र दिसुन येते आहे त्यामुळे कोरोनाग्रस्त व कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे.