आजपर्यंत बीड जिल्ह्यात 73522 रुग्ण कोरोनामुक्त
(23 May)- बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असला तरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे वाढते प्रमाण दिलासा देणारे आहे. कोरोना विषाणूचे लक्षणे आढळतात त्वरित निदान करून वेळीच उपचार घेतल्यास कोरोना पासून लवकरात लवकर मुक्तता होते. जिल्ह्यात रुग्णवाढीबरोबर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढती आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहिती नुसार आज बीड जिल्ह्यातून तब्ब्ल 974 रुग्नांना कोरोनमुक्तीची पावती भेटली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 81184 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर 1861 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 16 .17 एवढा आहे तर रिकव्हरी रेट 90.56 एवढा आहे. आजपर्यंत बीड जिल्ह्यात 73522 रुग्ण कोरोनामुक्त झाली आहेत.