बीडमध्ये प्रथमच चिरफाड न करता शवविच्छेदन

राज्यात प्रथमच कोरोना बाधित रुग्णाचे मौखिक शवविच्छेदन

(22 May)- कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यास त्याचे शवविच्छेदन केले जात नाही, तर मृतदेहावर थेट अंत्यसंस्कार केले जातात. आयसीएमआर ने देखील कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाचे थेट शवविच्छेदन टाळावे अशाच सूचना दिलेल्या आहेत. मात्र शुक्रवारी आयसीएमआरच्या निर्देशांनुसार मृतदेहाची कोणतीही चिरफाड न करता मौखिक निरीक्षणांवरून हे शवविच्छेदन करण्यात आले.

दरम्यान कोरोनाग्रस्तांचे शवविच्छेदन करण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. बीडच्या एका खाजगी रुग्णालयात कोरोनासाठी उपचार सुरु असताना एका व्यक्तीने आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून अहवाल देण्याची विनंती बीड शहर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयाला केली. कोरोनाग्रस्त मृतदेहाचे शवविच्छेदन करावे की नाही यावरून बराच वाद झाला आणि अखेर आयसीएमआरच्या निर्देशांनुसार मृतदेहाची कोणतीही चिरफाड न करता मौखिक निरीक्षणांवरून हे शवविच्छेदन करण्यात आले.

error: Content is protected !!