दुसरी लाट रोखण्यास बीड जिल्ह्याला यश आले– पालकमंत्री धनंजय मुंडे
(22 May)- ऑक्सिजनची निर्मिती बीड जिल्ह्यातच केली जाणार आहे. यापुढील एक महिन्यात बाहेरून ऑक्सिजन मागवण्याची गरज भासणार नाही. दुसरी लाट रोखण्यास बीड जिल्ह्याला यश आले आहे. यापुढे कितीही मोठी आपत्ती आली तरी आरोग्य सुविधा देण्यास कमी पडणार नाही असे वक्तव्य बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आष्टी येथील ॲड.बी.डी. हंबर्डे महाविद्यालयातील आधार कोविड सेंटरच्या उद्घाटना प्रसंगी केले तर कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे कोरोनाकाळात गोरगरीब जनतेसाठी देवदूत बनले आहेत असे कौतुक त्यांनी केले.
आ.बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी येथील ॲड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात आधार कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे.या केंद्राचे उद्घाटन आज दि.२२ मे रोजी सकाळी १० वाजता पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्घाटनास ऑनलाईनच्या माध्यमातून उपस्थित होते.यावेळी आ.रोहित पवार म्हणाले की, आष्टी,पाटोदा, शिरुर विधानसभा मतदार संघाच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहील असे आश्वासन दिले.यावेळी आ.संदीप क्षीरसागर, आ.बाळासाहेब आजबे,आ.यशवंत माने, माजी आ.साहेबराव दरेकर,माजी आ. अमरसिंह पंडित यांच्यासह आदी उपस्थित होते.