आकस्मिक मृत्यूची नोंद
(22 May) – जामवाडी (ता.जालना) येथील तलावात धुणे धुण्यासाठी गेलेल्या कु. काजल राजु मंजुळकर (वय १३) हिचा पाय घसरून ती पाण्यात बुडू लागली. तिला बाहेर काढतांना खोल पाण्यात पाय गेल्याने गावातील शेख जमीला शेख अमीर (वय ३०) या महिलेचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान काजल मंजुळकर ही बालबाल वाचली असून, तिच्यावर जालना येथील विवेकानंद हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी (दि. २१) दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. मयत शेख जमीला शेख अमीर हिच्या पश्चात ३ वर्षाची मुलगी, ५ वर्षाचा मुलगा आहे. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.