बीड- आर्थिक अडचणींना वैतागून चहा विक्रेत्यानं केली आत्महत्या

राहत्या घरी घेतला गळफास

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या अनुषंगाने सतत होत असलेले लॉकडाऊन आणि घर प्रपंचसाठी चालवले जाणारे व्यावसाय बंद असल्याने निर्माण झालेल्या आर्थिक विवेंचनेतून सिरसाळा येथील एका चहा विक्रेत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुरुषोत्तम बाबूराव मिसाळ वय ४२ रा. हिवरा. हल्ली मुक्काम सिरसाळा ता. परळी वैद्यनाथ, असे मयत व्यक्तीचे नाव पत्ता आहे.

मिसाळ गेल्या अनेक वर्षांपासून पासून घर प्रपंच / उदार निर्वाहासाठी चहाची छोटी हॉटेल चालवत असत व याच बरोबर लग्न समारंभात बॅडं वाद्य वाजवण्याचा व्यावसाय होता. परंतु लॉकडाऊन मुळे हे दोन्ही व्यावसाय बंद पडले परिणामी घरचा उदार निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला, लॉकडाऊन संपता संपेना व या मुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. या आर्थिक विवेंचनेतून दिनांक २० वार गुरुवार रोजी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान सिरसाळा येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सिरसाळा पोलिसांनी पंचनामा करुन बॉडी शवविच्छेदनासाठी प्रा.आ.केंद्रं सिरसाळा येथे पाठवली. कलम १७४ नुसार आकस्मत मृत्यूची नोंद मयताचे सासरे दळवी यांच्या खबरी वरुन केली आहे. तपास पो.हे. कॉ. मिसाळ करत आहेत. मयत मिसाळ यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई वडिल असा परिवार आहे.

error: Content is protected !!