फडणवीसांचा खुलासा! पंतप्रधान मोदींनी गुजरातचा दौरा केला, महाराष्ट्राकडे कमी लक्ष का दिले?

फडणवीसांचं विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

तौत्के चक्रीवादळामुळे महाराष्ट्र केरळ, गोवा, गुजरात या राज्यांच्या किनारपट्टीभागाला मोठा फटका बसला. चारही राज्यांत चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले. मात्र, या वादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरात आणि दीव या भागांची हवाई पाहणी केली. तसेच गुजरात राज्यात तातडीच्या मदतकार्यासाठी पंतप्रधानांनी 1000 रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली. पंतप्रधानांनी गुजरातचाच दौरा केल्याने त्यांच्यावर टीका होत होती.

महाराष्ट्रातही यामुद्यावरुन सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली. आता याच मुद्द्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. चक्रीवादळग्रस्त असलेल्या कोकण दौऱ्यावर असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा केला महाराष्ट्राकडे कमी लक्ष दिले? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा केला याचं कारण म्हणजे लँडफॉल गुजरातमध्ये झालं. गुजरातमध्ये लँडफॉल झाल्याने प्रचंड नुकसान झालं. 45 नागरिकांचा मृत्यू झाला. गावंच्या गावं 100 टक्के उद्वस्त झाली त्यामुळे पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा केला, तातडीची मदत केली.

error: Content is protected !!