चौका चौकात पोलिसांचा कडक बंदोबस्त
कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण रोकण्यासाठी बीड जिल्ह्यात प्रशासनाने कडक निर्बंध लावलेले आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. बीड शहरातल्या विविध भागात पोलीसांनी नाकाबंदी करत त्याठिकाणी वाहन धारकांची चौकशी सुरू केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर आज सकाळपासून पोलीसांनी वाहन धारकांची कसून तपासणी केली. यावेळी एपीआय शेख यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यांच्यासह आदिंची उपस्थिती होती. दुपारपर्यंत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या १४५ सडकफीऱ्यांवर कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.