नागापूर खुर्द येथील नदीपात्रात आरोपी सापडला
जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत दोन सख्ख्या भावांवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना काल रात्री तालुक्यातील नागापूर खुर्द येथे घडली होती. या घटनेने जिल्हा हादरून गेला. हत्या करून फरार झालेला आरोपी परमेश्वर साळुंके हा नागापूर खुर्द येथील नदीपात्रात असल्याची माहिती पिंपळनेर पोलीसांना मिळताच पोलीसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सदरील कारवाई पिंपळनेर पोलीस ठाण्याचे शरद भुतेकर, पीएसआय सानप, सुरवसे, कारले, सानप यांनी केली.