केजमधील 9 हातभट्टी अड्डे उद्ध्वस्त

94 हजार 500 रुपयांचे रसायन व इतर साहित्य आढळले

केज शहरातील मेन रोड, भवानी माळ, क्रांतीनगर, या परिसरामध्ये हातभट्टी दारू गाळली जात असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, फौजदार महादेव गुजर, बाळकृष्ण मुंडे, अशोक नामदास, चालक हनुमंत गायकवाड यांनी रात्री सदरील ठिकाणी धाडी टाकून 9 हातभट्टी अड्डे उद्ध्वस्त केले. सदरील ठिकाणी रसायन व इतर साहित्य आढळून आले होते. या साहित्याची किंमत 94 हजार 500 रुपये इतकी होती. हे रसायन नष्ट करण्यात आले. या प्रकरणी संबंधितांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

error: Content is protected !!