संजय राऊत म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’मधला तिवारी ; मनसेचे टीकास्त्र

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्याही संकटाशी सामना करु शकतात, ही गोष्ट कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमगली असेल. त्यामुळेच तौक्ते चक्रीवादळानंतर पंतप्रधान मोदी (PM Modi) महाराष्ट्रात न येता फक्त गुजरातच्या दौऱ्यावरच गेले असावे, अशी टीका राऊत यांनी केली .यावरून मनसेने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहे . मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

हा हिडीओ पहा….

Beed police checking

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjya Raut) म्हणजे सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमधील तिवारीच्या पात्राप्रमाणे आहेत. त्यांना ‘अहं ब्रह्मास्मि’चा भास होतो, ते त्याच थाटात वावरत असतात, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे . तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निदान मुंबईत तरी पाहणी करण्यासाठी बाहेर पडावे, असेही देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वत:च्या राज्यावर प्रेमही आहे. पण आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातही यावे. म्हणजे ते भारताचे पंतप्रधान आहेत, असे वाटेल. पंतप्रधान येऊन गेले तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्रात फिरतील, असे देशपांडे यांनी म्हटले.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी मिळून सत्ता स्थापन केली . त्यांनी काहीही केले तरी ते माफ असते. त्याशिवाय आणखी कोणत्या पक्षाने काही केले तर ते राजकारण ठरते, असे प देशपांडे यांनी म्हटले.

error: Content is protected !!