पंधरा मिनिटात बीडच्या शेतकऱ्यांच्या पोरांनी केला ‘मोदीं’चा इनबॉक्स फुल्ल

मुंबई: अधिच कोरोनाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने खत दरवाढीचा झटका दिला आहे. त्यामुळे खत दरवाढीला मोठा विरोध होत असून,स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना ई-मेल पाठवून दर कमी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटात मोदींचं इनबॉक्स फुल्ल झाला असल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्या पूजा मोरे यांनी केला आहे.

केंद्र सरकारने खताचे दर मोठ्याप्रमाणात वाढवले असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. तर याला विरोध करण्यासाठी आता शेतकरी संघटना सुद्धा पुढ्या आल्या आहेत. खताच्या दर दरवाढीला विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी ई-मेल आयडीवर निवेदन पाठवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

मात्र,मोहीम सुरू होताच अवघ्या पंधरा मिनिटात शेतकऱ्यांच्या पोरांनी पंतप्रधान मोदींचे ई-मेल इनबॉक्स निवेदन पाठवून फुल्ल केलं आहे.आता फक्त मेलची गर्दी दिस्तीये असेच जर एकजुटीने रस्त्यावर उतरलो ना तर काय होईल, असा टोला पूजा मोरे यांनी मोदींना लगावला आहे.

लॉकडाऊन, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचं आधीच कंबरड मोडलं आहे. त्यातून कसाबसा सावरत बळीराजा पुन्हा नव्या जोमाने तयारी करत असताना आता खतांची दरवाढीमुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

error: Content is protected !!