महाराष्ट्र मध्ये लॉकडाउन असताना बीड मध्ये सगळे सुरू आहे. बीडच्या जिल्हाधिकारीयांच्या आदेशाला कोणताही दुकानदार जुमानता नाही. बंद दारा आड सगळे सुरू आहे. सुभाष रोड वरील मराठवाडा टेक्सटाईल हे दुकान सरस सुरू आहे. बिलमध्ये तुम्ही बघू शकतात 11532 रुपयाची खरेदी कालच्या दिवशी म्हणजे 13 मे 2021 ला झाली आहे.
जिल्हाधिकारी आणि SP , CEO हे फक्त रोड शो करण्यात बिझी आहेत तुमची यंत्रणा एवढी पकड असेल तर तुम्हाला रोडवर फिरण्याची गरज काय? याचा अर्थ तुमचा तुमच्या अधिकार यावर वचक राहिलेला नाहीये ज्याअर्थी तुम्हाला रोडवरती उत्तरांची वेळ येत आहे त्या अर्थी तुमच्या हाताखालची अधिकारी हे निष्क्रिय आहेत आणि तुमचा त्यांचावर वजक नाही यामधून हे सिद्ध होत
यांची फक्त सिव्हील मध्ये नातेवाईकांना हकल्यांवर भर
सिविल हॉस्पिटल मधील नातेवाईकांना हाकलून लावणे हेच आता यांचे काम राहिलेले आहे. साहेब सिव्हील हॉस्पिटलला येणारा नातेवाईक हाऊस म्हणून तिथे येत नाही. त्यांना तुम्ही आश्वासन द्या की त्यांच्या नातेवाईकांची तुम्ही काळजी घेणार. रॅमडीसीवरचा होणार काळाबाजार यामुळे त्यांच्या पेशंटला औषध भेटले की नाही याची धास्ती नातेवाईकना लागून आहे. आणि जोपर्यंत यामध्ये पारदर्शकता येत नाही तोपर्यंत नातेवाईक येतच राहणार तुम्ही असले पोलीस फौजफाटा लावून नातेवाईकांचा आक्रोश ओढून घेतात.
नातेवाईकांनाचा प्रॉब्लेम समजून घ्या
त्यांची प्रॉब्लेम समजून घ्या जरी पेशंट चांगला असला तरी तो जेवण करत नाही त्याला आग्रह करून जेवण भरावा लागतं यासाठी नातेवाईकांना तिथेच राहावं लागतं. पेशंट आधार द्यावा लागतो शेजारचा पलंगावरचा पेशंट मेल तर चांगला पेशंट घाबरून bad होतो. त्यासाठी नातेवाईक तिथे थांबून पेशंटला आधार देतात.
जम्बो ची गरज असते सिलेंडर उचलून नेहून देण्याची जिमेदारी ही वॉर्डबॉयची असते. पण तुमचे वर्डबॉ हे काही काम करत नाहीत त्यामुळे नातेवाईकांना सिलेंडर उचलून घेऊन जावं लागत.