वाचा, बीड जिल्ह्यात आज किती आढळले कोरोना रुग्ण?

बीडमध्ये सर्वधिक रुग्णसंख्या

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बीड जिल्ह्यात 4454 जणांची चाचणी करण्यात आली त्यापैकी 1437 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बधितांमध्ये अंबाजोगाई-242, आष्टी-84, बीड- 345, धारूर- 85, गेवराई-107, माजलगाव-58 , केज-195, परळी-58, पाटोदा-126 , शिरूर- 90, तर वडवणी येथे 47 रुग्ण आढळले आहेत.

बीड आणि अंबाजोगाई येथे रस्त्यावर फिरणाऱ्या 214 हिंडफिऱ्याची अँटीजन टेस्ट करण्यात आली त्यात 17 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत म्हणून आज एकूण बीड जिल्ह्यात 1454 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

error: Content is protected !!