जमाव बंदीचे केले उल्लंघन
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी न करणाऱ्यां विरोधात प्रशासन काठोर कारवाई करत आहे. आ विनायक मेटे यांनी उभारलेल्या कोईड सेंटरचे उदघाटन करण्यासाठी बीड मध्ये विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज सकाळी बीड मधील भाजपा कार्यालया समोर पश्चिम बंगाल मध्ये भाजपा कार्यकर्त्यावर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेदार्थ तेथील सरकारचा निषेध केला. या वेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमवून जिल्हात लागू असलेल्या जमाव बंदीचे उल्लघन केले म्हणून शिवाजी नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.